आधुनिक काळातील टेंशन मुक्तिचा खात्रीशीर उपाय म्हणजे शिरोधारा होय. शिरोधारा म्हणजे औषधी द्रव्याची डोक्यावर धारा सोडणे. यामध्ये औषधी द्रव्य कोमट असणे व अखंड धारा डोक्यावर पडणे महत्वाचे असते. आजच्या युगात सर्व सुखी कोणीच नाही. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत चिंता ही अगदी पाचीला पुजलेली. प्रत्येक मनुष्यानुसार चिंतेचे फक्त स्वरूप बदलते. संघर्ष, चिंता, चिडचिड, निद्रानाश, मनोविकार, नैराश्य यामुळे शांतता हरवून बसलेल्या या आधुनिक युगात प्रत्येकालाच गरज वाटतेय ती शांततेची … पर्यायाने मानसिक आरोग्याची … यावर खात्रीशीर उपाय म्हणजे शिरोधारा . आम्ही त्याला आधुनिकतेची जोड देवून यांत्रिक शिरोधारा उपकरणाची सुविधा देवुन त्यालाच धार्मिकतेची जोड देत आल्हाददायक, शांततापूर्ण प्रसन्न अशा नाविन्यपूर्ण वातानुकुलीत सुसज्ज शिरोधारा कक्षाची सुविधा प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुरु केलेली आहे. एक वेगळा अनुभव म्हणून स्वास्थपुर्ण व्यक्तिही याचा अनुभव घेवू शकतात. शिरोधारामुळे मन प्रसन्न तर होतेच परंतू आत्मविश्वास देखिल वाढतो. शांत व मर्यादित झोप, चिडचिडेपणा घालविणारा व मन:शांती देणारा आयुर्वेदातील एक खात्रीशिर उपाय म्हणजे शिरोधारा आहे.